vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिका निवडणूक -2026 काँग्रेस-वंचित यांच्यात युती:महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान

 मुंबई महानगरपालिका निवडणूक -2026 काँग्रेस-वंचित यांच्यात युती:महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत  काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. दलित आणि मुस्लिम मतांचे समीकरण जुळवत या नव्या आघाडीने भाजप-शिंदेसेनेची महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. मुंबई मनपाच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे, तर उर्वरित जागांवर काँग्रेस लढणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर २८ महापालिकांमध्येही अशाच प्रकारची युती करण्याचे संकेत सपकाळ यांनी दिले

मतांचे विभाजन रोखणार,मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाल्याने त्यांचा फोकस मराठी मतांकडे असणार आहे. मुंबईत मुस्लिम मते २० ते २२ टक्के तर दलित मते ८ ते १० टक्के आहेत. त्यामुळे दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतांची एकजूट साधण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला वंचितच्या साथीने आपली गमावलेली ताकद पुन्हा मिळवण्याची संधी आहे.

संबंधित पोस्ट

पैठण येथील युवती बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

vishwatmaklokswamivarta

मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा

आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पलूस तालुक्यासाठीच्या ८ यांत्रिक बोटींचे औदुंबर येथे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

सुप्रसिद्ध बॉलीवूड आसामी गायक झुबीन गर्गला मारल्याचा कट? मुख्यमंत्र्यांकडून CID चौकशीचे आदेश…

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ यशस्वीरित्या पार पडली

vishwatmaklokswamivarta