vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

नांदेड प्रतिनिधी :- राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, साठवणूक व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याचे अनुषंगाने महसूल व वन विभागाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी परिपत्रक प्रसिध्द केले आहे. या निर्देशानुसार परिवहन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून संयुक्त तपासणी व प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ज्यामध्ये बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. अवैध वाहतूकीमध्ये संबंधित वाहनाकडून पहिल्यांदा गुन्हा आढळून आल्यास वाहनाचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित करून वाहन जप्त करण्यात येईल. दुसऱ्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास 60 दिवसांसाठी परवाना निलंबित करून वाहन जप्त करण्यात येईल. तिसऱ्यांदा किंवा वारंवार गुन्हा आढळल्यास संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत कार्यवाही करुन परिवहन विभागामार्फत कारवाई पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7) व 48 (8) अन्वये दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी परिवहन विभागाकडून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्हयातील वाळू माफिया व बेकायदेशीर खनिज वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास तसेच शासनाच्या महसुलाचे संरक्षण होण्यास हातभार लागणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती..

विशेष लेख-हिंद दी चादर ; गुरु तेगबहादुर यांचे 350 वर्षांचे बलिदान पर्व…

vishwatmaklokswamivarta

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार समिती बंधनकारक

vishwatmaklokswamivarta

महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जखमींची विचारपूस करून दिला धीर

vishwatmaklokswamivarta

सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना छत्री वाटप