vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मेरा युवा भारततर्फे तालुकास्तरीय खेळ स्पर्धा

मेरा युवा भारततर्फे तालुकास्तरीय खेळ स्पर्धा

    अमरावती, प्रतिनिधी) : मेरा युवा भारत आणि नांदगाव खंडेश्वर जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.  यावेळी जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र जेवडे, तालुका वकील संघ उपाध्यक्ष मोहन जाधव, शीतल काळे उपस्थित होते.

  यात कबड्डी, खो-खो, 100 मीटर मुलांचे धावणे, गोळाफेक, 100 मीटर मुलींची धावणे, खो-खो या स्पर्धेत विजेता संघाला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, तसेच वैयक्तिक खेळाडूंना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पारितोषिक म्हणून मेरा युवा भारत अमरावती, युवा कार्यक्रम विभाग युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार ही ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.

         या स्पर्धा मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूपेंद्र जेवडे यांनी आयोजित केल्या. स्पर्धेसाठी जन स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला.

00000

संबंधित पोस्ट

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी; 25 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta