vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नुकत्याच अमरावती, मेळघाट, अकोला, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या होत्या, या भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबतची आढावा बैठक मंत्रालयातील समिती सभागृहात झाली.

बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, डॉ. सरिता हजारे उपस्थित होते. संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच आदिवासीबहुल भागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

आदिवासी बहुल सर्व जिल्ह्यात आरोग्य तपासणीचे विशेष कॅम्प आयोजित करावेत. अमरावती जिल्ह्यातील ‘धारणी’ येथील आरोग्य संस्थेचे श्रेणीवर्धन करावे. रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तातडीने करावी. सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वछता ठेवावी व उत्तम आहार व्यवस्था चांगली करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मेळघाटातील ॲनेमिया निर्मूलन मोहीम, सिकलसेल तपासणी मोहीम अधिक प्रभाविपणे राबवावी. तसेच ग्रामविकास विभागाशी संबंधित पदे भरण्याबाबत आवश्यक कार्यवाहीचे

संबंधित पोस्ट

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

vishwatmaklokswamivarta

निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! – सुराज्य अभियान**नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’; वृक्षारोपण केलेले १७,००० वृक्ष ‘बेपत्ता’!