vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ उपक्रम-विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रेरक मुलाखती व संदेश प्रसारित…

स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ उपक्रम-विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रेरक मुलाखती व संदेश प्रसारित…

​अहिल्यानगर, प्रतिनिधी- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत योगदान देणारे विविध अधिकारी, मान्यवर व्यक्ती आणि संस्थांच्या प्रतिनिधींच्या प्रेरक मुलाखती व शुभेच्छा संदेश विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रसारित केले जात आहेत.

​रेडिओच्या माध्यमातून घराघरांत सकारात्मक संदेश पोहोचत असल्याने मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. अहिल्यानगर आकाशवाणी, रेडिओ नगर, रेडिओ आशा, रेडिओ सिटी, बिग एफएम, रेडिओ ऑरेंज तसेच विविध कम्युनिटी रेडिओ सेंटर्सवरून हे प्रसारण सुरू आहे. यात निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे, प्रक्रियेतील विविध अधिकारी, जिल्हा मतदारदूत डॉ. अमोल बागुल, तसेच उपक्रमात सहभागी सिनेअभिनेते, कलाकार, मतदार समन्वयक, स्वयंसेवक आणि स्वीप धुरंधर यांच्या निवडणूक प्रक्रियेविषयीच्या मुलाखती, शुभेच्छा संदेश आणि जिंगल्स प्रसारित करण्यात येत आहेत.

या उपक्रमासाठी आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे, रेडिओ नगरचे संचालक भूषण देशमुख, तसेच आरजे प्रसन्न, धनेश खत्ती, सचिन जगताप, तन्मय जयस्वाल, राधिका कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे जात प्रमाणपत्र व लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सातबारा वाटप

vishwatmaklokswamivarta

प्रा. लक्ष्मण हाके यांनी जीआर फाडला खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल..

vishwatmaklokswamivarta

शोषितांच्या हक्कासाठी अण्णाभाऊंचे विचार प्रेरणादायी: सतीशराव घाटगे,अंतरवाली टेंभी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा उत्साहात..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

शंखनाद महोत्सव : ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ उद्बोधन सत्र !**राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते!* – मेजर गौरव आर्य, चाणक्य फोरम्

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta