vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427

तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427

 

नांदेड, प्रतिनिधी : केंद्र शासनाचा ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, 2019 व त्याअंतर्गत नियम 2020 संपूर्ण देशात लागू करण्यात आले आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहेया पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हेल्पलाईनद्वारे तृतीयपंथीय व्यक्तींना त्यांच्या हक्कांबाबत माहिती, मार्गदर्शन व सहाय्य मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी या नॅशनल हेल्पलाईन क्रमांकाचा व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

००००००

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले • समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न …

पैठण कडे जाणाऱ्या जड वाहतुक मार्गात दि.९ ते ११ दरम्यान बदल

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगाचे सर्वेक्षण व प्रमाणपत्र वितरण करा- मंत्री अतुल सावे

2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सौर उर्जा प्रकल्पामुळे दूध उत्पादक सभासदांना फायदा – मंत्री हसन मुश्रीफ सहकारी संस्थेचा देशातील पहिला सौर उर्जा प्रकल्प करमाळ्यात; गोकुळ सहकारी दुध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी