vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

राज्य प्रतिनिधी-महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोन असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते. हीच गरज ओळखून राज्य शासनाने महिलांसाठी ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, या क्लिनिकच्या माध्यमातून, तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत राज्य शासनाने उचललेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

मेनोपॉज हा आजार नाही, तर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. मात्र या टप्प्यात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. राज्यातील प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

00000

 

संबंधित पोस्ट

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील साकीनाका येथे रस्त्यावरील उघड्या मेन हॉलमध्ये पडून एका स्थानिकाचा मृत्यू झाले असल्याची वृत्त

स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

vishwatmaklokswamivarta