vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात तातडीने मदत कार्य करण्यासाठी माजी सैनिकांच्या अनुभवाचा वापर करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आपदा प्रशिक्षण 9 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सहभागी होणाऱ्या सर्व माजी सैनिकांची राहण्याची (निवासी), चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक आपदा मित्राला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी माजी सैनिकाचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे दि. 27 जानेवारी 2026 पर्यंत ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो व आधार कार्डसह अर्ज विहित मुदतीत सादर करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

चेंबूर पेट्रोल पंप कुर्ला स्टेशन मार्गावरून नेहरूनगर डेपो अशी सेवा सुरू करण्याची मागणी-धारावीकरांना चेंबूर मध्ये जाण्यासाठी बस सेवेची अडचण-

गुंतवणुकदारांसाठी रेड कार्पेट, उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – विजयलक्ष्मी बिदरी नागपूर विभागाच्या गुंतवणुकदार परिषदेमध्ये ६ हजार कोटीचे सांमजस्य करार

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास‍ शिंदे यांनी केली गवळीदेव पर्यटनस्थळ विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना २०२६ चा ‘शिव सन्मान पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे-पीडित मुलीशी व तिच्या कुटुंबीयांशी आदिती तटकरे यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीकरिताऑनलाईन अर्ज भरण्यास दि.26 नोहेबर पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta