vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लखपती दिदी’च्या माध्यमातून मिळेल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लखपती दिदी’च्या माध्यमातून मिळेल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर,-केंद्र शासनाच्या ‘लखपती दिदी’ या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरणास बळ मिळणार आहे. तरी या योजनेच्या अंमलबजावणीस गती द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.

 लखपती दिदी सुकाणू समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंदनसिंग राठोड, जिल्हा शिक्षणाधिकारी(योजना) अरुणा भूमकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे आदी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पातळीवर करावी. यात महिला सुरक्षा, मुलींचा जन्मदर वाढवणे, त्याचप्रमाणे महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यवसाय वृद्धीसाठी समन्वय आवश्यक आहे.यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा महिला बालविकास विभागामार्फत करण्यात यावे. ‘लखपती दिदी’ या योजनेअंतर्गत दिलेले उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करावे. आजीविका या पोर्टल वरील सर्व नोंदी अद्यावत कराव्या. लखपदी दिदी योजनेत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा. महिलांना भांडवल आणि बँकांचे सहकार्य, सूक्ष्म गुंतवणूक, उत्पादक गटांची स्थापना, आणि सेंद्रिय शेती गटाची स्थापना यास प्राधान्य देऊन विविध शासनाच्या योजनांची अंमलबजावणी एकत्रित करून महिलांचे आर्थिक उत्पन्न जास्तीत जास्त वाढावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.०००००

संबंधित पोस्ट

विकसित महाराष्ट्र 2047; नागरिक सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवा!जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे नागरिकांना आवाहन

उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे  

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी २.० अर्ज प्रक्रिया सुरूनवीन ‘महाआयडी’ अनिवार्य; अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या महाविद्यालयांना सूचना..

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी’एक जिल्हा एक नोंदणी’व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद,मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांसाठी मराठी, तेलगु आणि कन्नड भाषेमध्ये शासकीय योजंनाची माहिती देणाऱ्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन