vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर…

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर…

 

 मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र नाताळ भव्यतम सोडत दि. ३ जानेवारी २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालय सभागृह या ठिकाणी काढण्यात आली. पहिले सामायिक २५ लाख रुपयांचे एक बक्षीस चिराग एन्टरप्रायजेस,नाशिक येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

या सोडतीमधून जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी या ब्रीद वाक्याचा पुरेपूर अवलंब करण्यात आला. रक्कम १० हजार च्या आतील रकमेची ७० बक्षिसे व रु.१०,००० वरील रकमेची २ हजार ५८२ बक्षिसे लागली आहेत. एकूण सर्व बक्षिसांची रक्कम ४९ लाख ४ हजार इतकी होती.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम 10 हजार रुपयांवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. 10 हजार रुपयांच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.0000

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त धारावीत ज्येष्ठांसाठी माहिती संवाद संपन्न

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हरभरा नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ !आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश,

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित;१५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप