vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी- राज्यातील १५ कोटी रुपयांपर्यंतच्या विकास प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि गती आणावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

वित्त विभागाच्या २० सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार (GR) विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देताना येणारे तांत्रिक अडथळे दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश देत बंदरे मंत्री राणे म्हणाले, २०१९ च्या शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे की नाही, याची पडताळणी करण्यात यावी. विविध विभागांमधील तांत्रिक आणि प्रशासकीय समन्वय वाढविण्यात यावा. याद्वारे १५ कोटींपर्यंतच्या लहान व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होऊन विकासकामांना वेग मिळेल, असेही बंदरे मंत्री राणे यांनी सांगितले.

बैठकीस वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव विवेक दहिफळे, उपसचिव ठाकूर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श पी. प्रदीप यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

शिरूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा**अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या**- पालकमंत्री शंभूराज देसाई*

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लेखक दिनकर काकडे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा,रस्ते, आरोग्य सुविधा, शाळेच्या कामांना तातडीने प्राधान्य द्यावेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

घरकुल, आरोग्यसह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

 अरुणोदय तर्फे आठ फेब्रुवारी एमआयजी मध्ये चालण्याची स्पर्धा

vishwatmaklokswamivarta