vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर• 15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर• 15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

 

मुंबई, प्रतिनिधी :- राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून 29 महापालिकांपैकी 15 महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते. राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकच पद आरक्षित होत आहे,.नियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी पद देय होत नाही. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 3 पदे आरक्षित झाली असून, त्यापैकी 2 पदे अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी 8 पदे आरक्षित झालेली असून, त्यापैकी 4 पदे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत.

उर्वरित 17 महानगरपालिकांमधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी 9 पदे येत असून, त्यापैकी 8 पदे खुला (सर्वसाधारण) या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत.

महापौर पदासाठी आरक्षण

अनुसूचित जमातीसाठी राखीव महापालिका – कल्याण-डोंबिवली,अनुसचित जातीसाठी राखीव महापालिका – ठाणे (सर्वसाधारण), जालना (महिला), लातूर (महिला).नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षण) – जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला.नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) – पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर,सर्वसाधारण महिला आरक्षण – पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, नांदेड-वाघाळा, मालेगाव, मीरा- भाईंदर, नागपूर, नाशिक.सर्वसाधारण प्रवर्ग – छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी-निजामपूर.

००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ,निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार, रिंगणात 3 उमेदवार..

गडांचा राजा : राजगड

vishwatmaklokswamivarta

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान..

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

vishwatmaklokswamivarta

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे..!मिशन मोडवर काम करावे  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ