vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

राज्य प्रतिनिधी-केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारत पर्यटन, छत्रपती संभाजीनगरतर्फे कर्नाटक टुरिझम सोसायटीच्या सहयोगाने देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे 29 जानेवारी 2026 रोजी बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यामुळे कर्नाटक आणि छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटन क्षेत्रातील संबंधितांना पर्यटन संधींवर सविस्तर आणि अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी एक मौल्यवान व्यासपीठ उपलब्ध झाले. यात झालेल्या चर्चांमध्ये कर्नाटकातील विविध पर्यटन स्थळांवर, तसेच छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध जागतिक वारसा स्थळे आणि इतर महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व सांस्कृतिक आकर्षणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.कार्यक्रमाला भारत पर्यटन, मुंबईचे (मध्य आणि पश्चिम विभाग) क्षेत्रीय संचालक मोहम्मद फारूक आणि भारत पर्यटन, छत्रपती संभाजीनगरच्या सहाय्यक संचालक मालती दत्त यांचा बहुमोल पाठिंबा आणि मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या सामूहिक गायनाने झाली. क्षेत्रीय संचालक मोहम्मद फारूक यांनी उपस्थितांना संबोधित केले. अशा उपक्रमांमुळे पर्यटन क्षेत्रातील संबंधितांमध्ये उत्साह, सहकार्य आणि समन्वय वाढतो आणि देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक टुरिझम सोसायटीचे डेस्टिनेशन प्रमोशन आणि फॅम टूर समितीचे अध्यक्ष रोशन पिंटो यांनीही मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे विविध राज्यांमधील पर्यटन स्थळांच्या परस्पर प्रचारासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते आणि देशांतर्गत पर्यटनाच्या वाढीस महत्त्वपूर्ण योगदान मिळते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात कर्नाटक पर्यटन क्षेत्रातील 35 संबंधितांनी, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ), ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर (टीएएसीएच) आणि फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एफएचआरएआय) यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.केंद्रीय पर्यटन मंत्रालय देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे आणि हा बी2बी पर्यटन मेळावा कर्नाटक आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील पर्यटन संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

जागतिक वारसा स्थळे आणि अनेक ऐतिहासिक स्मारकांसाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटन-समृद्ध छत्रपती संभाजीनगरला या उपक्रमामुळे कर्नाटकात अधिक प्रचार होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, कर्नाटकातील पर्यटन स्थळांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिक प्रचार केला जाईल. यामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये पर्यटनाला अधिक चालना मिळण्यास साहाय्य होईल.

संबंधित पोस्ट

ऑनलाईन गेम्सवर विनियमनासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार- राज्यमंत्री पंकज भोयर

चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार,राज्यात नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर भर

रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू- राज्यमंत्री योगेश कदम

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :प्रत्येक जिल्ह्यात आदर्श वसतीगृह उभारणार वसतीगृहांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतुद- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

vishwatmaklokswamivarta

गोव्याच्या अर्पोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन्स- 25 पैकी 23 गुदमरुन दगावले, आग लागल्यावर कर्मचारी का पळाले नाहीत? मृतांमध्ये दोघे महाराष्ट्राचे,  यादी

vishwatmaklokswamivarta