vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम एकूण १२ दिवसीय निवासी स्वरुपाचा असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दि. १२ फेब्रुवारी रोजी इच्छूक स्वयंसेवकांच्या पुढील बॅचेस कोलाड जि.रायगड येथे पाठविण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दि.१० फेब्रुवारी पर्यंत जमा करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत असून प्रत्येक आपदा मित्राकरीता वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ERK), ३ वर्षाकरीता ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण व येणे जाणे आणि निवास व भोजनाची व्यवस्था पूर्णतः शासन व शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत विनामूल्य करण्यात आली आहे. तसेच महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच व येण्या जाण्याची सुविधा करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छूक असलेल्या व यापूर्वी नामनिर्देशने सादर करण्यात आलेल्या स्वयंसेवकांनी आवश्यक असलेली कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि.१० फेब्रुवारी पर्यंत जमा करावी.

आवश्यक कागदपत्रेः-आधार कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला किंवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,महाविद्यालयाचे ओळखपत्र,पासपोर्ट फोटो, नोकरी करत असल्यास नोकरीचे ओळखपत्र.

निवड निकष: अर्जदार व्यक्ती भारताची नागरिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असावी. शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम, वयोमर्यादा १८ ते ४५वर्ष, (माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंता, शासकीय आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत अधिकारी व कर्मचारी यांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल, त्या करीता वयोमर्यादा ५५ वर्षे असेल मात्र त्यांना विमा सुरक्षा देता येणार नाही)

अधिक माहितीसाठी संपर्क अधिकारी / कर्मचारीः-१.श्री. विवेक राजेंद्र उबाळे,जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर,संपर्क क्रमांक : 7058010450२.श्री. मोहम्मद अश्रफ खान, DDMS,छत्रपती संभाजीनगर,संपर्क क्रमांक : 9910728487ई-मेल : ddmaurangabad16@gmail.com

०००००

संबंधित पोस्ट

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

जालना दर्गाह वक्फ मालमत्तेतील अनियमिततेवर त्वरित कारवाईची मागणी अर्जदारांचे व्यवस्थापन समितीला निवेदन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार