vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद-७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान वाशिम–बुलढाणा जिल्ह्यात ब्लॉक

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद-७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान वाशिम–बुलढाणा जिल्ह्यात ब्लॉक

 

बुलढाणा, प्रतिनिधी: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील विविध टप्प्यांवर दि. ७ फेब्रुवारी २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकूण ३५ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावरील कि.मी. १७८+९०० ते २९०+४०० दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरुळपीर, मालेगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या मार्गावर ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामासाठी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक तत्काळ सुरू करण्यात येईल.

महामार्गावरील मुंबई व नागपूर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर ठराविक वेळेत परिणाम होणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रवासाचे नियोजन करूनच मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :दि. ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध तारखांना रात्री १२ ते १ वाजेपर्यंत तसेच दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत, मुंबई व नागपूर वाहिनीवर अनुक्रमे कि.मी. १७८.९००, १७९.७५०, १८३.७००, १८५.५००, १९०.४००, २००.४००, २०५.४००, २०८.२००, २०८.८५०, २३८.५५०, २४२.६००, २४५.४००, २५०.५००, २६०.४००, २६४.८००, २७०.४००, २८०.४००, २८१.४०० व २८३.९०० या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलिस, महामार्ग प्रशासन व सूचना फलकांचे पालन करावे, असेही महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दक्षिण दिल्लीतील साकेत मेट्रो स्थानकाजवळ एक व्यापारी इमारत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.13 जखमी लोकांवर उपचार सुरू

पुनर्वसनाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत‍ छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले…

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जातीय विषमते विरोधात लढणारे पत्रकार भाई छोटू कांबळे यांचा सत्कार

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी २०२५ या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta