vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी:- राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने अत्याधुनिक ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार जुनी कागदपत्रांवर आधारित पडताळणी प्रक्रिया बंद करून ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अनुदानित एकविध क्रीडा संघटना, पदाधिकारी तसेच संबंधित खेळाडूंनी अनिवार्यपणे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

सदर शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी व या प्रणालीचा लाभ तळागाळातील खेळाडूंपर्यंत पोहोचावा, यासाठी क्रीडा संचालनालयामार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही तातडीने राबविण्यात येत आहे

क्रीडा संघटनांसाठी अनिवार्य कार्यवाही :• आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा अधिनस्त असलेल्या तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत क्रीडा संघटनांना शासन निर्णयातील तरतुदींची तात्काळ माहिती देणे बंधनकारक आहे • स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी व गुणपत्रिका विहित नमुन्यात .xlsx फाईल स्वरूपात ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टल (https://sports.maharashtra.gov.in/) वर अपलोड करणे आवश्यक आहे. • सदर माहिती संबंधित अधिकृत पदाधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरी (DSC) करून प्रमाणित करणे बंधनकारक राहील.

दंडात्मक तरतूद : • निर्धारित ७ दिवसांच्या मुदतीत माहिती ब्लॉकचेनवर अपलोड न करणाऱ्या संघटनांचा समावेश स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे स्वयंचलितपणे ‘डिफॉल्टर’ यादीत करण्यात येईल. • अशा परिस्थितीत खेळाडूचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित क्रीडा संघटनेची राहील, याची स्पष्ट नोंद घ्यावी.

खेळाडूंच्या नोंदणीबाबत : • जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना नवीन प्रणालीची माहिती देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. • खेळाडूंनी आधार-संलग्न आयडीद्वारे ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टलवर लॉग-इन करून नोंदणी करणे अनिवार्य आहे. • खेळाडूंनी सादर केलेली माहिती व क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेनवर अपलोड केलेला रेकॉर्ड हॅश (Record Hash) यांची प्रणालीद्वारे स्वयंचलित पडताळणी होणार असल्याने, यापुढे खेळाडूंना प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही.

0000000

संबंधित पोस्ट

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

जालना जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

क्रीडा शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून घडतील उत्कृष्ट खेळाडू-कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर,बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलात उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta