vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कारागृहात कुष्ठरोग तपासणी कार्यक्रम संपन्न -कारागृहातील 179 बंदीवानांची केली कुष्ठरोग तपासणी

कारागृहात कुष्ठरोग तपासणी कार्यक्रम संपन्न -कारागृहातील 179 बंदीवानांची केली कुष्ठरोग तपासणी

        रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- कुष्ठ मुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहिम अभियान 2025-26 अंतर्गत अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांकरीता विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर कार्यक्रमात कारागृहातील एकूण 179 बंदीवानांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांनी दिली आहे.

    महाराष्ट्रात 2027 मध्ये शुन्य कुष्ठरोग प्रसारध्येय साध्य करण्यासाठी कुष्ठरोग मुक्त सुरक्षा महाराष्ट्र (कुसुम) शोध मोहिम कार्यक्रम 30 जानेवारी 2025 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान अलिबाग तालुक्यात राबविण्यात येतआहे. सहाय्यक संचालक, आरोग्यसेवा (कुष्ठरोग) रायगड-अलिबाग यांच्या मार्फत अलिबाग जिल्हा कारागृहात शिबीर आयोजित करण्यात आले असून डॉ. सचिन सकपाळ (वैद्यकीय अधिकारी) यांनी बंदीबांधवांना कुष्ठरोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली तसेच कुष्ठ रुग्णांचा शोध, निदान आणि मोफत उपचार यावर भर देण्याच्या अुनषंगाने कारागृहात दाखल 179 बंद्यांची कुष्ठरोग बाबतची तपासणी करण्यातआली

     या कार्यक्रमाकरीता मा.सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग,रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत डॉ.सचिन सकपाळ (वैद्यकीयअधिकारी) कुष्ठरोग तज्ञ, भगवान जाधव (वैद्यकीय सहाय्यक), तेजसमोरे (लिपिक), राजकुमार गाजुलवार (निम्न वैद्यकीय कर्मचारी), प्रतिक पाटिल (सांखिकी सहाय्यक), ऋतिक जाधव (आरोग्य सेवक), श्रीम.सोनाली जाधव, (आशा सेविका), डॉ.मिलिंद पाटील (उपाध्यक्ष), प्रबोधन सामाजिक सेवा संस्था,अलिबाग तसेच देवलु मुकुंद रांजड (सुभेदार), सुनिल जाधव (हवालदार), प्रशांत पाटील, सतिश जुंबळे, नरसु जयंद्रथ कोळी (कारागृह शिपाई) इत्यादी कारागृह अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते. ०००००००

संबंधित पोस्ट

लम्पी आजाराच्या व्यवस्थापनाकरिता वेळीच करा उपाययोजना; कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

विशेष लेख :-उन्हाळ्यातील जनावरांचे चारा व पाणी व्यवस्थापन

vishwatmaklokswamivarta

उष्माघात कक्षांसह जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज अतिउष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा हायअलर्ट; सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास विशेष सुविधा उपलब्ध..

जागतिक आरोग्य संघटनेकडून इबोला उद्रेक ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित; आफ्रिका रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून ‘खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित

सिकलसेल, थॅलेसेमिया, हेमोफिलिया जनजागृती सप्ताह 

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत टीबी मुक्त भारत 100 दिवसांची विशेष माहिम