vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदान वाढ झाल्याने संशोधन वृत्तीला बळ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदान वाढ झाल्याने संशोधन वृत्तीला बळ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

​शिर्डी, प्रतिनिधी : शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य संधी उपलब्ध करून दिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी उत्तम गुणवत्ता सिद्ध करू शकतात. याच अनुषंगाने जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनासाठीच्या अनुदानात १ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून, यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला अधिक पाठबळ मिळेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राहाता तालुक्यातील एकरूखे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे ७४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून साकारण्यात आलेल्या चार वर्गखोल्या, इंटरअॅक्टीव्ह बोर्ड व ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इस्रो सहलीसाठी निवड झालेला जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी श्रेयस नालकर व इतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात आता शहरी व ग्रामीण असा भेदभाव राहिलेला नाही. आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगली प्रगती करत आहेत. तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता चांगल्या पद्धतीने राखली जात असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

​अनेक विद्यार्थी गणित व विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. या विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी मिळाव्यात, यासाठी यंदाच्या वर्षापासून प्रदर्शनाच्या अनुदानात १ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी वैज्ञानिक सहलीकरिता जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुक्यातील गावांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळातर्फेकर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य सेवेला बळ; शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितता वाढणार

सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विविध प्रकल्पांचे लोकार्पण

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर असे करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य• मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण-    महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण

जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे-संतोष खांडेकर