vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथनगुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथनगुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

अकोला, प्रतिनिधी नरनाळा निसर्ग महोत्सवात गुंतवणूकदारांची परिषद (इन्व्हेस्टर्स मीट) दि. 17 फेब्रुवारी रोजी दु. 2 वा. शहानूर येथे आयोजित करण्यात आली असून, पर्यटन विकासाच्या शक्यता, संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन आणि अकोट वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या सहकार्याने नरनाळा महोत्सवाचे आयोजन दि. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. मेळघाटचे वनवैभव व ऐतिहासिक महात्म्य लाभलेला नरनाळा किल्ला परिसरात पर्यटन विकासाच्या अनेक शक्यता व नानाविध संधी आहेत. त्याबाबत परिषदेद्वारे माहिती देण्यात येणार आहे. या परिषदेत गुंतवणूकदारांना हेरिटेज टुरिझम, इको-टुरिझम, साहसी पर्यटन, हॉस्पिटॅलिटी. पायाभूत सुविधा, पर्यटनस्थळ विकास, व्यवसाय सुलभता, संबंधित योजना याबाबत जाणून घेता येणार आहे

 तरी अधिकाधिक गुंतवणूकदारांनी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपवनसंरक्षक राहूलसिंह टोलिया व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   संपर्क : 📞 +91 8092343431✉️ asinhg@linpico.in

000000

संबंधित पोस्ट

जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सखोल चर्चा आणि व्यापक सल्लामसलत सुरू केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन • फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान • प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्वावर निवड

नवी मुंबई महानगपालिकेची मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ८७६ कोटींचा कर वसूल…

भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

जातपडताळणी समित्यांच्या अस्तित्वावरून विखे पाटील लक्ष्यावर..ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा जात पडताळणी समित्या संदर्भातील सल्ला हा असंविधानिक व बेकायदेशीर असून ते सकल मराठा समाजाची परत परत फसवणूक करत असल्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू