vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यात बालकामगार प्रथेला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत पाच बालकामगारांची सुटका करण्यात आली. तसेच एका आस्थापना मालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बालकामगार अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

14 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार, दोषी मालकास किमान 3 महिने कारावास आणि 20 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात कुठेही बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ 1098 या चाईल्डलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बालकामगार शोध मोहिमेसाठी जिल्हा बालकामगार अधिकारी, चाइल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींचे एक विशेष संयुक्त पथक गठित करण्यात आले होते. या पथकाने शहरातील विविध दुकाने, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक छापे टाकले. या कारवाईत एकूण पाच अल्पवयीन मुले काम करताना आढळली. यात एका 14 वर्षांखालील बालकाचा आणि 16 वर्षांवरील चार किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले आहे. समितीच्या आदेशानुसार या मुलांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 चे उल्लंघन केल्याप्रकरणी एका मालकावर कठोर कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा- अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

vishwatmaklokswamivarta

बैलपोळ्यासह बुलढाण्यात झाला अनोखा “ट्रॅक्टर पोळा”!मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी; शेकडो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होऊन सणाला दिला आधुनिक रंग.

रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी मुंबई अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची अधिकृत नियुक्ती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली

vishwatmaklokswamivarta