vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी –

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.

केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (#एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य #खादी व #ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, यांचे कार्यालय, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे. हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे, असेही श्री.साठे यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी एमएसएमईचे उपसंचालक सुनील खुजनरे मुंबई (मो.८३०८४०९०१९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई, महाराष्ट्र लोकभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.    

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार· जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद

नवी मुंबई महानगरपालिकेची बेकायदेशीर बांधकाम धडाकेबाज कारवाई सुरू घणसोली विभागात अतिक्रमण विरोधी कारवाई

vishwatmaklokswamivarta

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई – मंत्री गुलाबराव पाटील