vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दशावतार नाट्य महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई कडून आयोजन-सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर ठाणे येथे 05 दिवसीय दशावतार नाट्य महोत्सव आयोजन

दशावतार नाट्य महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई कडून आयोजन-सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर ठाणे येथे 05 दिवसीय दशावतार नाट्य महोत्सव आयोजन

        ठाणे प्रतिनिधी :- महाराष्ट्र दशावतार लोककला ही कोकणाच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे दशावतार लोककला ही कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख लोककला आहे. ही कला भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित आहे आणि ती पौराणिक कथांवर आधारित नाटके सादर केली जातात. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘दशावतार नाट्य महोत्सव या भव्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, दि.25 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता, सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर, सावरकर जगर, ठाणे येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दशावतार महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील विविध दशावतार मंडळांचे सादरीकरण करणारे 100 हून अधिक कलाकार एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, खानोलकर पारंपरिक दशावतार मंडळ, खानोली आणि सिध्दीविनायक दशावतार नाट्य मंडळ, डोंबिवली यांसारख्या पारंपरिक लोककलांचे जिवंत दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

महाराष्ट्राची लोकसंस्कृती जतन करणे आणि या दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना ऊर्जितावस्था देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केलेले आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

नागरी भागातील बालाकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त- मंत्री आदिती तटकरे,सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

नवी मुंबईत बांधकाम स्थळांवरील डासउत्पत्ती स्थानांवर कार्यवाहीची विशेष मोहीम..

शहापुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न शेकडो नागरिकांना घरबसल्या मिळाला शासकीय योजनांचा लाभ…

जन्माष्टमी निमित्त लोकभवनमध्ये भजनसंध्या

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेचा नवीन वर्ष 20 26 चा नवा नियम! 1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, मुंबईतून सुटणाऱ्या ट्रेन….

vishwatmaklokswamivarta