vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्राबार कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्राबार कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा-बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा व डान्सबारविरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली काही ठिकाणी डान्सबार चालवले जातात. अशा ठिकाणी कारवाई केल्यानंतरही पुन्हा त्याच प्रकारे व्यवसाय सुरु केला जातो. त्यामुळे राज्य शासनाने ठरवले आहे की तीन वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येईल. या अधिवेशनात किंवा पुढील अधिवेशनात यासंदर्भात आवश्यक दुरुस्ती प्रस्तावित केली जाईल

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिले आहेत. राज्य शासनाने विविध वेळा कायदे आणि नियम तयार केले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या. तरीदेखील राज्य शासनाने नव्याने नियम आखले असून त्यानुसार ऑर्केस्ट्रा बार चालवण्यासाठी विशिष्ट जागा, पार्टीशन, अल्कोहोलवरील निर्बंध आदी अटी घालण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पनवेल येथील प्रकरणाची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत आमदार भास्कर जाधव यांनी सहभाग घेतला.

संबंधित पोस्ट

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली ऐरोली विभागातील विविध सेवासुविधांची पाहणी*

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर· सभापती, सदस्य पदांची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला ; राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिवाळी कालावधीत ऋतुमानानुसार होणारी पानगळ नैसर्गिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्ती कक्ष व हेल्पलाइन कार्यान्वित शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा..