vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश

नांदेड, प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व जतन व संवर्धन व्हावे हा उद्देश आहे. मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करताना पारंपारिक कार्यक्रमासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून विविध माध्यमाचा वापर करुन मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करावा अशा सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन..

सांगवी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत विशेष बैठकीचे आयोजन

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी 21 जुलैपर्यंत मुदत..

कृष‍ि विभागाची धडक कारवाई-अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल