vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि समाजसेवकांचा सन्मान

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि समाजसेवकांचा सन्मान

मुंबई प्रतिनिधी-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२४-२०२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

इच्छूक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी आवश्यक पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे १५ मार्च, २०२६ पर्यंत कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगर यांनी केले आहे. पुरस्काराची जाहिरात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संबंधित पोस्ट

पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १६ मार्चपर्यंत मुदतवाढ..

मुंबई पोलीस दलातील  ३ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार व १ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती..

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण..

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन