vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

          नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विदयार्थ्यांकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची प्रथम मुदत दि. 20/06/2025 ते दि. 31/ 07 / 2025 पर्यंत होती. त्याचप्रमाणे दि. 15/08/2025 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेकरीता जाहीर आवाहन प्रसिध्द करण्यात आले होते.

          त्यानंतर वरील योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची व्दितीय मुदत दि. 15/08/2025 पर्यंत व विहित नमुन्यातील ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यास दि. 31/08/202 रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ त्याचप्रमाणे लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची तृतीय मुदत दि. 15/09/2025 पर्यंत व विहित नमुन्यातील ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यास दि. 30/09/2025 रोजी पर्यंत तृतीय व अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती.

          त्याअनुषंगाने शिष्यवृत्ती अर्जाची तपासणी केली असता ज्या लाभार्थ्यांनी शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्जांसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, अशा लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणेकामी अर्ज पुनश्च: पाठविण्यात (Send Back) आलेले आहेत.

          तरी सदर लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करणेकामी दि. 04 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. त्याबाबतचे SMS लाभार्थ्यांना त्यांचे भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणा-या लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील, याची कृपया सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुखांच्या सत्कारांचे आयोजन – जास्तीत-जास्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावेअंबड, बदनापूर, जालना विधानसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित राहावे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने आवाहन –

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन· पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा..

vishwatmaklokswamivarta

रोजगार हमी योजनेतील जुनी अपूर्ण कामे आठ दिवसात पूर्ण करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

झटपट नोकरीची हमी, लघुउद्योग करावयाचा आहे का..! कुशल कारागीर व्हायचं आहे..!तर मग आयटीआय ला प्रवेश घ्या…औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश सत्र -2025 साठी ऑनलाईन फॉर्म सुरु…