vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण स्वयं सहाय्यता समूहांमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय “जानकी महोत्सव – 2026” व मिनी सरस विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 7 ते 11 मार्च 2026 या कालावधीत डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूल, आझाद मैदान समोर, जालना येथे भरविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी परिवारासह भेट देवून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांची उत्पादीत उत्पादने व खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या गुणवत्तापूर्ण व घरगुती उत्पादनांचे एकूण 80 स्टॉल्स उभारण्यात येणार असून, नागरिकांना ग्रामीण भागातील दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्टॉल्समध्ये गावठी पद्धतीने तयार केलेले मसाले, हळद, मिरची पावडर, पापड, खारोडी, धपाटे पीठ, ढोकळा पीठ, विविध डाळी, बाटी पीठ, विविध फरसाण, गावठी तूप, अॅपल जॅम, मध, गोड पदार्थ, घोंगडी, योगा मॅट, पत्रावळी, लाकडी खेळणी आदी विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील अस्सल चविष्ट शाकाहारी व मांसाहारी जेवण, तसेच दहीधपाटे, झुणका-भाकर, भरीत-भाकरी, मिसळ, वडापाव अशा विविध खाद्यपदार्थांची चवही नागरिकांना चाखता येणार आहे. ग्रामीण महिला बचत गटांनी तयार केलेल्या या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करावी व महिलांच्या उद्यमशीलतेला पाठबळ द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*

संबंधित पोस्ट

जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीयअवघ्या २१ दिवसांत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण ; आयुक्तांनी मानले नागरिकांचे आभार..

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक १७ जुलैला स्टील हब’च्या दिशेने रोडमॅपसह उद्योगवाढ, रोजगार आणि नवउद्योजकतेवर होणार सविस्तर चर्चा,उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

जमीन आमची… निर्णय तुमचा कसा? जिवंत असेपर्यंत जमीन देणार नाही- शेतकऱ्यांचा प्रशासनाला थेट इशारा,समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा एल्गार …

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

शिक्षणाच्या खासगीकरणावर भर : आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

vishwatmaklokswamivarta