vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खामगाव येथे 9 मार्च रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

खामगाव येथे 9 मार्च रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खाजगी आय.टी.आय., खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 9 मार्च 2026 रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

ही प्लेसमेंट ड्राइव्ह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खाजगी आय.टी.आय., शेलोडी रोड, खामगाव येथे सकाळी 10 वाजता होणार असून या उपक्रमातून नामांकित चिरायू पॉवर लिमिटेड, खामगाव या कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सोलार टेक्निशियन आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या करिअरला गती द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविणार-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे