vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा* 

*जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा*

 

  नवी मुंबई प्रतिनिधी- आजचा दिवस हा स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस असून ‘महिलांनी स्वप्न बघा, ती स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्यरत रहा आणि समोर आलेल्या अडचणींचे संधीत रूपांतर करण्यासाठी सज्ज रहा’, अशा शब्दात नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित विशेष समारंभानिमित्त त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.

          आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत्वाने एनएमएमटी परिवहन उपक्रमात महिला चालक असावेत यादृष्टीने त्यांना प्रशिक्षण देऊन कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी भूमिका महापौरांनी मांडली.

          याप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचेसमवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्री.दशरथ भगत, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील, सभागृह नेते श्री.सागर नाईक, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार व उपसभापती तथा ब प्रभाग समिती सभापती श्रीम.रूपाली भगत, क प्रभाग समिती सभापती श्री.प्रकाश मोरे, इ प्रभाग समिती सभापती श्रीम.चंद्रभागा मोरे, फ प्रभाग समिती सभापती श्रीम. ललिता मढवी, जी प्रभाग समिती सभापती श्रीम.हेमांगी सोनवणे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, विधी समिती सभापती श्रीम.सायली शिंदे, तसेच नगरसेविका श्रीम.अंजनी भोईर, श्रीम. स्वाती गुरखे, श्रीम.स्वप्ना गावडे, श्रीम.शुभांगी पाटील, श्रीम.गंगाताई पाटील, श्रीम.रेखा म्हात्रे, श्रीम.संतोषी म्हात्रे, श्रीम.सुरेखा नरबागे, श्रीम.अंजना म्हात्रे, श्रीम.माधुरी हरिजन, श्रीम.मिनाक्षी पाटील, श्रीम.ऐश्वर्या सोनावणे, श्रीम.दीक्षा कचरे, श्रीम.वैष्णवी नाईक, श्रीम.अदिती नाईक, श्रीम.ऐश्वर्या मढवी, परिवहन सदस्य श्रीम.राजश्री कातकरी, श्रीम.शितल भोईर, माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनावणे, श्रीम. उषा भोईर, श्रीम.वैजयंती भगत, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.संजय शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी स्त्री म्हणजे प्रेमाचा अथांग सागर असे सांगत कुटुंब व समाजातील स्त्रीचे महत्व अधोरेखित केले. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात नाव मिळविले आहे. तिच्या कर्तृत्वाला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा व स्त्रियांनी निर्मिलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी असे सांगितले. महानगरपालिकेच्या निधीचा योग विनियोग करून योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक गतीमान प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

          उपमहापौर श्री.दशरथ भगत यांनी दिलखुलास शैलीत नारीशक्तीला नमन करून मनोगताची सुरूवात केली व यापुढील काळात सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी करण्यावर गतीमान भर देण्यात येईल असे सांगितले.

          सभागृह नेते श्री.सागर नाईक यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील लखपती दिदी योजना यशस्वीपणे राबविण्याकडे विशेष लक्ष देऊन गृह लघुउद्योगाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे व त्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असे सांगितले.

          अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी आता सभागृह अस्तित्वात आल्याने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनांची माहिती पोहचविली जाईल असे सांगत यापुढील काळात नवी मुंबईतील विमानतळ, डाटा सेंटर याठिकाणच्या नोकरीकरिता आवश्यक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे प्रतिपादन केले.

          महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम.सलुजा सुतार यांनी प्रास्ताविकपर मनोगतात महिला व बालकल्याण समितीमार्फत विविध 25 प्रकारच्या योजना राबविल्या जात असल्याची माहिती देत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील असे सांगितले. या आर्थिक वर्षात 9500 हून अधिक लाभार्थ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा तसेच 25758 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

          यावेळी घणसोली येथे हॉटेल राधाराणी थाळी घर च्या संचालक श्रीम.मंदा भिवसेन उंडे यांना महिला उद्योजकता पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था / बचत गट यांना देण्यात येणारा विशेष पुरस्कार नुतन सहकारी सेवा संस्था, कोपरखैरणे यांना प्रदान करण्यात आला

          यासोबतच 8 प्रशासकीय विभागातील 8 उत्कृष्ट आशा सेविका आणि 8 महिला स्वच्छताकर्मींचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीम.स्नेहा राजेंद्र घोरपडे यांना उत्कृष्ट महिला पोलीस कर्मचारी, श्रीम. नेहा विलास मनुचारी यांना उत्कृष्ट प्राथमिक शिक्षिका व श्रीम. विजया ठाकूर यांना उत्कृष्ट माध्यमिक शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले.

          जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या समुहगायन, भजन, मंगळागौर, समुहनृत्य, समुह नाटिका, शॉर्ट व्हिडीओ स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी गायन स्पर्धा परीक्षक श्रीम. चित्रा बाविस्कर, श्रीम,प्रिया चांदुरकर, श्रीम.तन्वी गोरे तसेच समुहनृत्य स्पर्धा परीक्षक श्री.सचिन पवार, श्रीम,कल्पिता राणे, श्री.आदित्य हळबे, श्री.विलास चव्हाण आदी परीक्षकांना सन्मानीत करण्यात आले.

विशेष पैठणी ड्रॉ मधील विजेत्या आठ विभागातील प्रत्येकी एक महिलेस मानाची पैठणी देऊन सन्मानीत करण्यात आले.

           याप्रसंगी महिला बचत गट व महिला मंडळे यांनी उत्पादित केलेल्या साहित्य वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. सकाळी 9 वा. पासून महिलांच्या नानाविध सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगलेल्या या महिला दिन विशेष कार्यक्रमाप्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळे हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला.

0000

संबंधित पोस्ट

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना धक्का, तर एकनाथ शिंदेना धनुष्यबाण चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध संघटनेच्या मानद उपाध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड*

vishwatmaklokswamivarta

दशावतार नाट्य महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई कडून आयोजन-सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर ठाणे येथे 05 दिवसीय दशावतार नाट्य महोत्सव आयोजन

मुंबईतील लालबाग परिसरात तील करी रोड स्टेशन जवळ अविघ्न पार्क इमारतीमध्ये पुन्हा आग; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज..

vishwatmaklokswamivarta

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आज G-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे

vishwatmaklokswamivarta