vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन

राज्य प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह यांच्याशी आज दूरध्वनीवरून सोहार्दपूर्ण संवाद साधला.

या दोन्ही नेत्यांना नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेला विजय आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आगामी नवीन सरकारसाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. दोन्ही देशांची परस्पर समृद्धी, प्रगती आणि दोन देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सोबत काम करण्याची भारताची वचनबद्धताही त्यांनी व्यक्त केली

भारत आणि नेपाळमधील संबंधांच्या भविष्याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांच्या माध्यमातून परस्परांमधली भागीदारी येत्या काळात नवी उंची गाठेल, असेही पंतप्रधान म्हणाले.यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह यांच्याशी आज दूरध्वनीवरून सौहार्दपूर्ण संवाद साधला.

नेपाळमधील निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल तसेच राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. आगामी नवीन सरकारसाठी माझ्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांची परस्पर समृद्धी, प्रगती आणि कल्याणासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची भारताच्या वचनबद्धता व्यक्त केली.

परस्परांच्या संयुक्त प्रयत्नांच्या माध्यमातून येत्या काळात भारत आणि नेपाळमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचतील असा मला विश्वास आहे. ĺ

संबंधित पोस्ट

गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठीआंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या-पर्यटन मंत्री शंभुराज देसाई

vishwatmaklokswamivarta

रशियामध्ये भारताच्या पवित्र बुद्ध अवशेषांचे 50,000 हून अधिक भाविकांनी घेतले दर्शन- रशियामध्ये अभूतपूर्व आस्थेचे वातावरण भारताकडून पाठवण्यात आलेले पवित्र अवशेष एलिस्ता येथील प्रतिष्ठित गेडेन शेद्दुप चोइकोरलिंग मठात

vishwatmaklokswamivarta

महाकुंभ मेळ्यातून संत-महंतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे लोकार्पण ! हिंदु राष्ट्राची राज्यघटना हे रामराज्याचे स्वरूप असेल ! – स्वामी आनंदस्वरूप महाराज, शांभवी पीठाधीश्वर –

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आल तीव्रता भूकंपाचे केंद्र उत्तरेकडील बाघलान प्रांत…