vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एनएमआयसी-एनएफडीसीने अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्या प्रेरणादायी मुलाखतीचे केले आयोजन

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एनएमआयसी-एनएफडीसीने अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्या प्रेरणादायी मुलाखतीचे केले आयोजन

बॉलीवूड प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने, भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएमआयसी) माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील महिलांची प्रेरणादायी कारकीर्द व योगदान साजरे करण्यासाठी विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

एनएमआयसी-एनएफडीसीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि महाव्यवस्थापक डी रामकृष्ण उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रोग्रॅमिंग व मास्टर क्लास विभागाच्या प्रमुख गौरी नायर यांनी घेतलेल्या मुलाखतीत खुशबू यांनी सिनेक्षेत्रातले आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी स्मिथ यांनी केले. एनएमआयसीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे कर्मचारी, चित्रपट रसिक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी खुशबू यांचा सत्कार आणि स्वागत केले. खुशबू यांनी महिलांसाठी स्वाभिमान आणि वैयक्तिक निर्णय क्षमता महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. ‘नाही कधी म्हणायचे’ हे प्रत्येक महिलेला समजले पाहिजे कारण हा वैयक्तिक आवडनिवड आणि आत्मसन्मान यादृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे असे त्या म्हणाल्या. आपल्या जीवनातले अनेक महत्त्वाचे निर्णय अंतर्मनाच्या प्रेरणेने घेतल्याचे सांगून त्यांनी महिलांना त्यांनी, आपल्या अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवण्याचा आणि प्रथम स्वतःचा आदर करायचा सल्ला दिलासंवादात्मक कार्यक्रमात खुशबू यांनी चित्रपट सृष्टीतील आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडून दाखवला. हिंदी चित्रपट सृष्टीत बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री बनल्या, विशेषतः तमिळ चित्रपट सृष्टीतील. त्यांनी तेलगू आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले. त्यांच्या भूमिकांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता आणि चाहते लाभले. काही वर्षानंतर त्यांनी दूरचित्रवाणी, निर्मिती आणि समाजकारण या क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली. सार्वजनिक जीवनात व राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्या चित्रपट जगताच्या पलिकडील दुनियेत प्रभावी भूमिका बजावत आहेत.संवादक गौरी नायर (प्रोग्रॅमिंग आणि मास्टर क्लास प्रमुख) यांनी अभ्यासपूर्ण प्रश्नांतून खुशबू सुंदर यांच्या जीवनाचे आणि कारकीर्दीचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडून दाखवले. कार्यक्रमाच्या शेवटी महाव्यवस्थापक डी. रामकृष्ण यांनी एनएमआयसीमधील आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम अर्थपूर्ण व प्रेरणादायी केल्याबद्दल पाहुणे, आयोजक आणि उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला -महाकुंभमध्ये गंगा आरती करून कतरिना कैफ सासू वीणा कौशलसोबत घरी परतली.

vishwatmaklokswamivarta

इंडियाज गॉट लेटेंट नावाचा शो-करमणुकीच्या नावाखाली अश्लिलता रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना, यांच्यावर गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

हमाल दे धमाल’ चित्रपटाच्या**रम्य आठवणींना उजाळा* `विशेष शो’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* 

vishwatmaklokswamivarta

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

चतु:रस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार देऊन सन्मान, स्वरा जोशी हिला ही गंधार बाल पुरस्कार प्रदान.

vishwatmaklokswamivarta