vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

बुलढाणा ( प्रतिनिधी : जमीन महसुलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी मौजे किनगावराजा (ता. सिंदखेडराजा) येथील गट क्रमांक 785 मधील मालमत्तेचे समपहरण करण्यात आले असून सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव दि. 17 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालय, सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आला आहे.

कसूरदार सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूल थकबाकीच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मौजे किनगावराजा येथील गट क्रमांक 785, क्षेत्रफळ 0.81 हेक्टर आर., आकार रुपये 7.50/- असलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

निश्चित करण्यात आलेल्या दिवसापूर्वी संबंधित देय रक्कम भरली गेली नाही तर सदर मालमत्ता तिच्यावर असलेल्या सर्व भार, अनुदाने व संविदांपासून मुक्त करून जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येणार आहे.

हा लिलाव दि. 17 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता किंवा त्यानंतर तहसील कार्यालय, सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे होणार आहे. इच्छुक नागरिकांनी नमूद दिनांक व वेळेस उपस्थित राहून लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार सिंदखेडराजा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरएसएस शताब्दी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून …

पारंपारिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यावी: जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे*  *कृषी दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेत शेतकरी सन्मान सोहळा संपन्न* 

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे..

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार