vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उल्लास’ साक्षरता अभियानाची परीक्षा आता 29 मार्चला;नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश

‘उल्लास’ साक्षरता अभियानाची परीक्षा आता 29 मार्चला;नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश

     अमरावती, प्रतिनिधी: केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यात होणारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. 15 मार्च रोजी होणारी ही परीक्षा आता रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत असाक्षरांची नोंदणी आणि पोर्टलवर त्यांचे टॅगींग करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे तांत्रिक काम पूर्ण करण्यासाठी आणि साक्षरता वर्गातील उमेदवारांना परीक्षेसाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने राज्यस्तरावरून परीक्षेचा दिनांक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

     प्रलंबित असलेले नोंदणी व टॅगींगचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, साक्षरता वर्ग नियमितपणे सुरू ठेवून शिक्षकांनी या वर्गांना भेटी द्याव्यात आणि उमेदवारांकडून प्रश्नपत्रिकांचा सराव करून घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत सोमवारी नशामुक्ती निर्धार पदयात्रा- ⁠नशामुक्त सांगलीच्या दिशेने सामूहिक पाऊल- अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्त सांगली सुरक्षित सांगली उपक्रम⁠- कल्पद्रुम मैदानावर सकाळी 8.30 वाजता उपस्थितीचे आवाहन

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी चीन भारतीय हद्दीत ६० किलोमीटरपर्यंत घुसल्याचा दावा तथ्यांच्या आधाराशिवाय करू नये, असं म्हटलं आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संवेदनशीलतेने विट्याच्या रेयांश पवारला मिळाले जीवनदान- जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात दात्यांचा मोलाचा हातभार- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतूनही मिळाले एक लाख पंच्याहत्तर हजार…

गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जागतिक पातळीवर पोहोचेल    — पर्यटन मंत्री शंभूराज देसाई  विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील गणपतीचे घेतले दर्शन

vishwatmaklokswamivarta