vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सुकन्या समृद्धी’ व ‘आरडी’ खाते उघडा;16 मार्चपासून अमरावतीत विशेष मोहीम

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सुकन्या समृद्धी’ व ‘आरडी’ खाते उघडा;16 मार्चपासून अमरावतीत विशेष मोहीम

      अमरावती, प्रतिनिधी: भारत सरकारच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ आणि ‘महिला सक्षमीकरण’ अभियानांतर्गत अमरावती डाक विभागातर्फे 16 ते 18 मार्च 2026 या कालावधीत सुकन्या समृद्धी खाते आणि ‘आरडी खाते घरोघरी’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शून्य ते 10 वर्षे वयोगटातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये बचतीची सवय रुजवण्यासाठी डाक विभाग विशेष पुढाकार घेत आहे.

     या विशेष मोहिमेअंतर्गत, पालक आपल्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही नजीकच्या डाकघरात किमान 250 रुपये भरून उघडू शकतात. या योजनेवर सध्या 8.2% असा आकर्षक व्याजदर मिळत असून, खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड तसेच पालकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याशिवाय, बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी किमान 100 रुपये भरून आवर्ती ठेव (आरडी) खातेही उघडता येणार आहे, ज्यावर 6.7% व्याजदर लागू आहे. या खात्यासाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक असून सर्वसामान्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.    या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी डाक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष शाळा, अंगणवाड्या आणि घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. पालकांनी आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी खाते उघडून एक भरीव पाऊल उचलावे आणि स्वतःसाठी बचतीची सवय लावण्यासाठी आरडी खात्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर पि. ए. गेडाम यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

पावसाळ्यात जलजन्य आजार टाळण्यासाठी खबरदारी घ्या !!

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही – राज्य निवडणूक आयोग शनिवार दि. १५ रोजी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे रोजगार निर्मिती ला प्राधान्य ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती,वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे