vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाऊंडेशन (#सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाऊंडेशन (#सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार

आरोग्य प्रतिनिधी-

लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाऊंडेशन (#सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारासाठी विशेष पुढाकार घेतला.

हा उपक्रम माता व बाल आरोग्य, पोषण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि रोग नियंत्रण यांसारख्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीस बळकटी देईल. विशेषतः वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत महत्त्वाचे आरोग्य संदेश व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या भागीदारीअंतर्गत सामाजिक व वर्तन बदल उपक्रम अधिक नाविन्यपूर्ण, पुराव्यावर आधारित व संशोधनाधारित पद्धतीने राबविले जाणार असून, समुदाय सहभाग व प्रभावी संवाद यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्याचा उद्देश आरोग्यविषयक वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आणि राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राज्यभर पोहोचविणे व त्याची परिणामकारकता वाढविणे हा आहे.

या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य संप्रेषणाला धोरणात्मक बळ मिळेल व सातत्यपूर्ण सामाजिक व वर्तन बदलाच्या माध्यमातून अधिक चांगले आरोग्य परिणाम साध्य करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला#सामंजस्यकरार

संबंधित पोस्ट

भारती हॉस्पीटल सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात “कुष्ठरोग शोध मोहीम सुरूविना निदान कुष्ठरुग्ण शोधण्यावर भर; २,४३२ पथके करणार सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta

नियमित लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आढावा; जिल्ह्यात लवकरच ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण सुरू

vishwatmaklokswamivarta

सिकलसेल तपासणी करून घ्या – आरोग्य विभागाचे आवाहन सिकलसेल जनजागृती सप्ताह : ११ ते १७ डिसेंबर २०२५

vishwatmaklokswamivarta

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच यशस्वी ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया संपन्न