vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अमृत संस्थेमार्फत टंकलेखन व लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना;30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

अमृत संस्थेमार्फत टंकलेखन व लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना;30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

        अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) आणि लघुलेखन परीक्षेचा निकाल 10 मार्च 2026 रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘अमृत’ संस्थेने परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू केली असून, पात्र विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

      या योजनेचा लाभ प्रामुख्याने अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) यांसारख्या विविध समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahaamrut.org.in/) भेट द्यावी.

      अर्जदारांकडे सन 2025-26 किंवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र , जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा (उदा. टी.सी., निर्गम उतारा), जानेवारी 2026 चे उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि बँक खात्याचा तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश) ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून विहित मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई

रिझर्व बँक ऑफ इंडिया’तर्फे गुरुवारी (दि.२०) ‘टाऊन हॉल बैठक’

महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने: अमरावतीतील उद्योजकांना ‘मैत्री’ पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन

महिला वाहन चालक प्रशिक्षक प्रशिक्षण