vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

बुलढाणा येथे शेळी, कुक्कुट व पशुपालन प्रशिक्षणाचे आयोजन; सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

बुलढाणा येथे शेळी, कुक्कुट व पशुपालन प्रशिक्षणाचे आयोजन; सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

बुलढाणा, द प्रतिनिधी: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) आणि जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 25 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत बुलढाणा येथे पार पडणार आहे.

    प्रशिक्षणाचा उद्देश सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध ज्ञान मिळवून स्वतःचा उद्योग/व्यवसाय सुरू करावा हा आहे. प्रशिक्षणादरम्यान शेळीपालन, कुक्कुट व गाय/म्हैस पालनातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध जाती व त्यांची वैशिष्ट्ये, लसीकरण, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती, चाऱ्याचे प्रकार तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. याशिवाय उद्योजकता विकास, उद्योग संधी, शासकीय योजनांची माहिती आदी विषयांवर तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार किमान 5 वी उत्तीर्ण, वय 18 वर्षे असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. नोंदणी, प्रशिक्षण शुल्क व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दि. 25 एप्रिल 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, MCED, जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलढाणा येथे किंवा मोबाईल क्रमांक ९०११५७८८५४ / ८२७५०९३२०१ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे जेम पोर्टल व ई-टेंडरिंग प्रशिक्षण कार्यक्रम

प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच.. पहा 24 कॅरेटचा भाव…

vishwatmaklokswamivarta

समाज कल्याण विभागांतर्गंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरूऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन..

इस्त्राईलमध्ये रोजगाराची संधी…

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..