vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्याची पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय झेप; ओडीपी प्लस कडे दमदार वाटचाल

जिल्ह्याची पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय झेप; ओडीपी प्लस कडे दमदार वाटचाल

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत बुलढाणा जिल्ह्याने पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.

वैयक्तिक शौचालय बांधकाम मोहिमेत सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात ३ हजार ८७९ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार ७५३ लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम पूर्ण केले असून एकूण प्रगती ९०.०२ टक्के इतकी झाली आहे. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित १२६ लाभार्थ्यांचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्याला हागणदारीमुक्त अधिक(ODF Plus Model) बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १ हजार २५१ गावांपैकी १ हजार ३५ गावे ODF Plus दर्जा प्राप्त करण्यात यशस्वी झाली आहेत, तर उर्वरित २१६ गावांमध्ये कामे सुरू आहेत.

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या बाबतीतही जिल्ह्याने भरीव कामगिरी केली आहे. एकूण गावांपैकी १ हजार १८२ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली असून ६९ गावांमध्ये कामे सुरू आहेत. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी १ हजार १६५ गावांमध्ये कामे पूर्ण झाली असून उर्वरित गावांमध्ये कामे प्रगतीपथावर आहेत.

दरम्यान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत बुलढाणा जिल्हा परिषदेला अमरावती विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा मान मिळाला आहे. मेहकर तालुक्यातील पांगरखेड तसेच बुलढाणा तालुक्यातील सावळी, सव व अजिसपूर या ग्रामपंचायतींनी विभागस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील गावांचे आरोग्यमान उंचावण्यासोबतच सामाजिक व आर्थिक जीवनमान सुधारण्यातही मोठी मदत होत असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बुलढाणा जिल्हा स्वच्छता क्षेत्रात आदर्श ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

00000

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स निवडचाचणी १४ मे रोजी

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची उपस्थिती,दिप ज्योत हातमाग खादी उद्योगाची भरारी!

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा! मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची मागणी..