vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) लघुलेखन परीक्षा व ऑनलाईन दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात घेण्यात येतात. माहे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दि.10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कागा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahaamrut.org.in/) ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि. 30 एप्रिल, 2026 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन अर्जासोबत गत आर्थिक वर्षाचे (सन 2025-26) अथवा पुढील आर्थिक वर्षासाठी (सन 2026-27) लागू असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा EWS प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. T.C./L.C./ शालेय निर्गम उतारा इ.), परीक्षा (माहे जानेवारी 2026) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते तपशीलासाठी बँकेचे पासबुक/रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque) याची स्पष्ट प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

00000000

संबंधित पोस्ट

अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

रिव्हर्स बायर-सेलर मीट २०२६ उद्घाटन संपन्न

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे लाभार्थ्यांना मिळणार’डिजिटल मार्केटिंग’, ‘ई-कॉमर्स’ची साथ

देशी गायींच्या पालनपोषण अनुदान योजनेसाठी,अर्ज करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta