vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी-नाशिक येथे 10 दिवसांचे मोफत पूर्व प्रशिक्षण

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी-नाशिक येथे 10 दिवसांचे मोफत पूर्व प्रशिक्षण

जालना, प्रतिनिधी:- भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाने प्रशिक्षणाचे द्वार खुले केले आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे दि.4 मे ते 13 मे 2026 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 65 चे आयोजन करण्यात आले आहे. तरी यासाठी जालना जिल्ह्यातील पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.24 एप्रिल 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना 10 दिवसांच्या या कोर्समध्ये तज्ज्ञांमार्फत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची सखोल पूर्वतयारी करून घेतली जाईल. विशेष म्हणजे प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी दि.24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी येताना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-65 कोर्सचे प्रवेशपत्र आणि परिशिष्टांची प्रिंट पूर्ण भरून सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.00000

0

संबंधित पोस्ट

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा -वनमंत्री गणेश नाईक

मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

महसूल दिन गुणगौरव सोहळा संपन्न अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक   –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न, संभाव्य पूर नियंत्रणासाठी समन्वय आणि प्रभावी नियोजनाचा निर्णय..

100 दिवस कृती कार्यक्रम व  योजनांचा आढावा जिल्हा परिषद ठाणे येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ई-मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई-माहिती कोष प्रणाली पोर्टलचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान होण्यास महत्त्वाचे  – मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta