vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, प्रतिनिधी: दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याबाबत राज्य शासन कटिबद्ध असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, कामाठीपुरा परिसरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने १२ जानेवारी २०२३ रोजी घेतला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार कुटुंबांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे उपलब्ध होणार आहेत. नगरविकास विभागाने ९ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार या प्रकल्पासाठी विशेष नियोजन प्राधिकरण घोषित केले आहे. तसेच, २२ जून २०२५ रोजी या संदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र विकासकांची नियुक्तीही निश्चित करण्यात आली आहे.

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, तरी या आठवड्यात कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल. याशिवाय, हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने याला ‘व्हायटल प्रोजेक्ट’चा दर्जा देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, उमरखाडी पुनर्वसन प्रकल्पा एकूण ८१ इमारतींच्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३६ इमारतींचे काम लवकरच सुरू केले जाईल. केंद्राचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर उमरखाडी परिसरातील १२ इमारतींच्या संरक्षक दुरुस्तीसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेराज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल,खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार-महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर- ⁠करजगी घटनेचा घेतला आढावा- पीडितेच्या कुटुंबाला दिला धीर- ⁠पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच- भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण…

जिल्हा परिषद ठाणेची अधिकृत वेबसाईट नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शक

vishwatmaklokswamivarta

मुंबई झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावीतर्फे आरती संग्रहाचे वाटप!