vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, प्रतिनिधी : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निकाली निघाला आहे. केवळ कर्जमाफी करून चालणार नसून शेतकऱ्यांना त्याच्या शेतीवर निर्भर करून उभे करावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराचे आयोजन केले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखेडे, महापौर श्रीचंद तेजवानी, बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना सर्व भेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. बँकेने शेतकऱ्यांसाठी विविध 31 योजना दिल्या आहेत. या योजना परिणामकारकरित्या राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम बँक करीत आहे. शेतकरी जगला तरच देश जगू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
अमरावती जिल्हा बँकेने 1400 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाचा गैरवापर होणार नाही, यासाठी संचालकांनी कार्य करावे, सहकारी बँका बुडाल्यास सर्वाधिक वेदना शेतकऱ्यांना होतात, याची जाण ठेवावी. त्यामुळे या बँकांचा विकासासाठी पूर्ण सहकार्य आणि मदत करण्यात येईल. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. प्रामुख्याने शेतामध्ये जाणारे रस्ते अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांनी पुढील पाच वर्षे कोणतीही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तसेच 2011 पूर्वी सरकारी जागेवर निवासी अतिक्रमण असलेल्या जागांना पंधराशे फुटांचे पट्टेवाटप करण्यात येणार असून एक हजार रुपयात नोंदणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री कडू आणि उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश बकाळ यांनी आभार मानले.

 

 

संबंधित पोस्ट

आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती,राज्यपालांकडून आयएमसीच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे कौतुक विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना मियावाकी जंगल निर्माण कार्यात सहभागी करण्याची राज्यपालांची सूचना..

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वितरण- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित

नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर

बॉलीवूडसाठी सर्वात मोठे नुकसान. महान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याचे शेतीत ऐतिहासिक पाऊल; कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फळशेतीचा यशस्वी शुभारंभ