vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी विभागात रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा कारनामा -दहा दिवसात दोन वेळा डांबरी ठिगळ लावून धारावीतील किरकोळ रस्ता दुरुस्ती..

धारावी विभागात रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा कारनामा -दहा दिवसात दोन वेळा डांबरी ठिगळ लावून धारावीतील किरकोळ रस्ता दुरुस्ती..

 

मुंबई प्रतिनिधी:

पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची कामे संपवा असे निर्देश दिले असतानाही धारावीतील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते संत कक्कया मार्ग या ठिकाणी पडलेल्या खाचखळग्या मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली किरकोळ कामे करून पळून जाणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर कारवाईची मागणी करण्यात येत आहे

प्राप्त माहितीनुसार-आयुक्त श्री भूषण गगराणी  यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची कामे संपवा असे निर्देश दिले असतानाही धारावीतील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते संत कक्कया मार्ग या ठिकाणी पडलेल्या खाचखळग्यांमुळे होणारे किरकोळ अपघात टाळण्याकरिता दिनांक 26 फेब्रुवारी 26 रोजी माननीय सहाय्यक पालिका आयुक्त जी उत्तर मार्फत ए इ मेंटनस रस्ता विभाग यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाही धारावीची रस्त्यांचे डांबरीकरण व्हावी अशा प्रकारचे लेखी निवेदन संघटक सचिव दिलीप गाडेकर धारावी नागरिक समिती यांच्या माध्यमातून देण्यात आले होते त्यामध्ये वेळे अगोदर रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास अपघात घडल्यास याची जबाबदारी महानगरपालिका यांच्यावर असेल असा इशारा श्री गिरीराज शेरखाने श्री शंकर बळी श्रीमती अलका साबळे श्री शंकर खिल्लारे श्री मयूर कांबळे श्री चंद्रकांत जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांनी दिला होता याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाडव्या मिरवणूक व रामनवमी या रस्त्यावरील कार्यक्रमात काही घटना घडल्यास पालिका प्रशासन राहणार का असा सवाल धारावी नागरिक समितीतर्फे दिल्यानंतर दिनांक 18 मार्च व 28 मार्च 2026 या मध्यरात्री दहा दिवसात संत कक्कया मार्गावर ओबडधोबड डांबरांची तिकडं लावून अर्धवट काम उरकण्यात आले रस्ता संपूर्ण दुरुस्ती करण्याऐवजी अर्धवट डांबरी खड्डे भरून काम झाल्याचे दिखाऊ पणा केला अशी लोकांमध्ये चर्चा आहे संबंधित खात्याच्या प्रमुखांनी त्या ठेकेदार ला सोबत घेऊन रस्त्याची पाहणी करावी व प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे जाणून घ्यावे अशी मागणी धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव दिलीप गाडेकर यांनी केली आहे

संबंधित पोस्ट

लेखक राजीव निळकंठ श्रीखंडे लिखित ग्लोबल साहित्य सफर भाग एक पुस्तक प्रकाशित…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सार्वजनिक ठिकाणीसीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार– गृहराज्यमंत्री योगेश कदम

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

दलित पँथर सारखी पुन्हा तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta