vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

म्हसळा तालुक्यात जमिनीच्या ‘पोटहिस्सा’ मोजणीचा पथदर्शी प्रकल्प**अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार अचूक मोजमाप*

म्हसळा तालुक्यात जमिनीच्या ‘पोटहिस्सा’ मोजणीचा पथदर्शी प्रकल्प**अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार अचूक मोजमाप*

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी-केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत (२०२४-२५) महाराष्ट्र राज्यातील जमिनींच्या पोटहिस्सा मोजणी आणि नकाशे अद्ययावत करण्यासाठी एका महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याची या विशेष प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील शेतजमिनींचे मोजमाप आता अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे.

    राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुके याप्रमाणे एकूण १८ तालुक्यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून म्हसळा तालुक्याचा यात समावेश असून, प्राथमिक टप्प्यात तालुक्यातील पाच गावांपासून या कामाला सुरुवात होणार आहे.

   प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात म्हसळा तालुक्यातील १.मौजे आगरवाडा, २.खरसई, ३.तोंडसुरे, ४.पाभरे, ५.वरवटणे या पाच गावांमध्ये कार्यवाही केली जाईल. या गावांचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण तालुक्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

  या मोजणी प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान. “कोर्स (CORS) आणि जीएनएनएस (GNSS) रोव्हर” या प्रणालीच्या साहाय्याने जमिनीचे मोजमाप केले जाईल, “जी.आय.एस (GIS)” आधारित मोजणी करताना संगणक प्रणालीद्वारे क्षेत्राची अचूक गणना केली जाणार असल्याने मानवी चुकांना वाव राहणार नाही. अचूक मोजमापामुळे शेतकऱ्यांचे ७/१२ अधिकार अभिलेख पूर्णपणे अद्ययावत होण्यास मदत होईल.

  याशिवाय या प्रकल्पामुळे जमिनींचे वाटप केवळ पारदर्शकच होणार नाही, तर भविष्यातील जमिनीचे वाद टाळण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून जमिनीचे मूल्य वाढण्यासही हातभार लागेल. तसेच जमिनीचे दस्तऐवज व्यवस्थित झाल्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

   “या प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष मोजणीचे काम लवकरच सुरू होत आहे. म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या जमिनींचे पोटहिस्से करून घ्यावेत आणि आपले अभिलेख अद्ययावत करून घ्यावेत, या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.सुनील इंदलकर यांनी केले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दख्खन जत्रा 2025 चे उद्‌घाटन- 21 मार्चपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन

महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात सर्वात युवा चेहरा कुमारी स्नेहा कासारे धारावीच्या प्रभाग क्रमांक 186 मध्ये भरणार फॉर्म…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी- मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी ; ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॅापचे वाटप..

सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी हे शिबिर महत्त्वाचे* *- ए.एस. राजंदेकर*

vishwatmaklokswamivarta