vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण करून १ मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शेंडा पार्कमध्ये सीपीआरसह शासकीय महाविद्यालय व विविध संस्थांचा आढावा

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण करून १ मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ-शेंडा पार्कमध्ये सीपीआरसह शासकीय महाविद्यालय व विविध संस्थांचा आढावा

कोल्हापूर, प्रतिनिधी: छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सी. पी. आर. चे नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आलेले आहे. ही सर्व कामे एप्रिलअखेर पूर्ण करून १ मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकार्पणासाठी सज्ज करूया, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शेंडा पार्कमध्ये सीपीआरसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय, शासकीय ग्रामीण रुग्णालय पथक- कागल, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय -मौजे सांगाव, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय -पिंपळगाव खुर्द, शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय- उत्तुर या विविध शासकीय संस्थांची आढावा बैठक घेतली.

यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आल्यानंतर परदेशातील एखाद्या प्रगत देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आल्यासारखे वाटले. हे संपूर्ण संकुल विकसित होईपर्यंत निधी तीन हजार कोटींच्या घरात जाईल.

सीपीआरच्या इमारतींसह भौतिक सेवासुविधा आणि यंत्रसामुग्रीसाठी २०० कोटीहून अधिक निधीतून नुतनीकरण होत आहे. या आढावा बैठकीत सीपीआरच्या मुख्य हेरिटेज इमारतीसह दूधगंगा इमारत, वेदगंगा इमारत, हिरण्यकेशी इमारत, सरस्वती इमारत येथील नूतनीकरणाची बहुतांशी कामे पूर्ण झाल्याचे सादरीकरण केले. हॉस्पिटलच्या आवारातील सर्व काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच; आठ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स पूर्ण झाली आहेत. मोठ्या इमारतींच्या टेरेसवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तयार केलेली १६ पैकी आठ निवारा शेड्स पूर्ण झाली आहेत, आठ अंतिम टप्प्यात आली आहेत. बाह्यरुग्ण विभाग दुसऱ्या मजल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील कामांबाबत माहिती देताना सदानंद भिसे यांनी सांगितले की, मुख्य प्रशासकीय इमारतीसह ऑडिटोरियम, शवागार, ग्रंथालय, परीक्षा भवन या इमारतींची सर्व कामे सेवा-सुविधांसह पूर्ण झाली आहेत. मुलींचे वस्तीगृह पूर्ण झाले आहे तर मुलांचे वस्तीगृह अंतिम टप्प्यात आले आहे. या परिसरातील ६०० बेड्सचे सामान्य रुग्णालय, २५० बेड्सचे कॅन्सर रुग्णालय आणि २५० बेड्सचे अति विशेषोपचार (सुपर स्पेशलिटी) रुग्णालय यांची कामे पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२७ अखेर आहे. या ईमारतींचे अकराव्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. उर्वरित सर्व कामे दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत करावयाचे आहेत.

हेरिटेजचे सौंदर्य अबाधित…..!सी. पी. आर. ची ऐतिहासिक जुनी मुख्य बिल्डिंग हेरिटेज म्हणजेच वारसास्थळ म्हणून जतन केली आहे. या इमारतीचे मूळ सौंदर्य तसेच ठेवून नूतनीकरण केल्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कंत्राटदाराचे या बैठकीत कौतुक केले.

या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलचे शासकीय शासकीय ग्रामीण रुग्णालय पथक, मौजे सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय तसेच उत्तुर येथील योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांचाही आढावा घेतला. ही सर्वच कामे प्रगतीपथावर असून येत्या दोन वर्षात ही सर्व कामे पूर्ण होतील अशी माहितीही या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली.

   या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, मौजे सांगावच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आयुर्वेदीक डॉ. अभिजीत अहीरे, उत्तुरच्या योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.भाग्यश्री खोत, डॉ. गिरीश कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

 

0000

संबंधित पोस्ट

माधवनगर येथे री-केवायसी व वित्तीय समावेशन शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला होणारØ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 ऑक्टोबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या-जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बांधव व अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta