vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जालना, प्रतिनिधी  जालना शहरातील सामानगाव रोड परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आता स्पष्ट झाले असून, हा प्रकार कोणताही नैसर्गिक आपत्ती नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे समोर आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने महावितरण (MSEB) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिघाड दुपारी सुमारे 4:45 वाजता दुरुस्त करण्यात आला. तसेच वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असुन, सध्या परिसरात स्थिती पूर्णपणे सामान्य आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित ठिकाणी असलेल्या 11 KV सॅटेलाइट फीडरच्या कंडक्टरचा संपर्क V-cross arm आणि RSJ पोलशी आला. हा संपर्क faulty pin insulator मुळे झाला आणि त्यामुळे विद्युत प्रवाह थेट पोलमार्फत जमिनीत उतरला (earthing). परिसरात खडकाळ (rocky) जमीन असल्यामुळे, या तीव्र विद्युत प्रवाहामुळे खडक वितळून लाव्ह्यासारखा दिसणारा पदार्थ बाहेर येताना दिसला, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. तरी नागरीकांना आवाहन करण्यात येते की, हा प्रकार ज्वालामुखी किंवा नैसर्गिक आपत्ती नसून तांत्रिक बिघाडामुळे झाला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

**

संबंधित पोस्ट

मातीच्या पणत्यांतून उजळतेय भविष्याचे आकाश;बालगृहातील मुलांना मिळाला नवा आत्मविश्वास!- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- बालगृहातील मुलांना कौशल्य विकासाचे धडे – 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास प्रक्रियेत रियल ईस्टेट क्षेत्राचा सहभाग महत्वाचा

मा. न्यायालयाच्या आदेशाचे सरकारने कठोर अंमलबजावणी केल्यास दलित आदीवासी भूमिहीन कास्तकराचे कास्तपट्टे नियमानूकुलित होतील – अ‍ॅड. भास्कर मगरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन..

300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे  भूमिपूजन

यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा

vishwatmaklokswamivarta