vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले

जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यात आगामी कालावधीत महात्मा फुले जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, लेनिन जयंती सीपीआय आदी सण, उत्सव तसेच शहरातील मिरवणुका व विविध कार्यक्रम आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.

          संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 21 एप्रिल 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, ४४४सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

चला जाणूया वनाला’ निसर्ग पर्यटन योजना*‍*मुलांना मिळणार वनांची माहिती*

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील 2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत…

पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आवश्यकतेनुसार धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा- मुख्य सचिव सुजाता सौनिक

सिंचन प्रकल्प विहित वेळेत  क्षेत्रही सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न- पाटबंधारे विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा- पूरपरिस्थिती रोखण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा करण्याचे निर्देश..

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर