vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या वतीने मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत चालू आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये करण्यात आलेल्या कामगिरीची माहिती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल कार्यालयाने सन-२०२५२०२६ या कालावधीत एकूण ८५ हजार ०१४ वाहनांची तपासणी केली असून त्यापैकी २२ हजार ५६७ दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत विविध गुन्हयांकरिता नियमभंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान या कार्यालयाकडून एकूण रु. १९०८.३७ लाख इतके तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

सन-२०२५२०२६ या कालावधीत नियमभंग करणाऱ्या दोषी वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे: हेल्मेट न वापरणे १० हजार ८५५, अवैध विमा (Invalid Insurance) – ५ हजार ६८७, ओव्हरलोड मालवाहतूक (Overload Goods Vehicle) – २ हजार १३९, वाहन चालविताना मोबाईलचा वापर ६०७, करार वाहन (PSV) मध्ये अनधिकृत माल/प्राणी वाहतूक १ हजार ९६६, वेगमर्यादा ओलांडणे (Overspeed) ५ हजार ६४२, ऑटो रिक्षा नियमभंग- 2 हजार १७७, अवैध प्रवासी वाहतूक – २८०, स्कूलबस नियमभंग – २१३

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत रस्ते सुरक्षेसाठी तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

सर्व सुजान नागरिकांनी रस्त्यावरील होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुक नियमांचे पालन करावे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, आवश्यक कागदपत्रे (विमा, परवाना, प्रदूषण प्रमाणपत्र इ.) अद्ययावत ठेवावीत व सुरक्षित वाहन चालन करावे.

००००००

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत सुव्यवस्थित रितीने संपन्न

vishwatmaklokswamivarta

धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती….

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमाचा वर्धापनदिन समारंभ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा-जिल्हाधिकारी आंचल गोयल

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन