vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली ग्वाही- एनएबीएल टेस्टिंग लॅब प्रकल्पात अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन- उद्योगांना पीएनजी गॅस पुरवठ्याची कार्यवाही 15 दिवसात करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली ग्वाही- एनएबीएल टेस्टिंग लॅब प्रकल्पात अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन- उद्योगांना पीएनजी गॅस पुरवठ्याची कार्यवाही 15 दिवसात करण्याचे निर्देश

 सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात उद्योगांच्या वाढीसाठी वाव आहे. उद्योगांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.

उद्योग विभागाच्या विविध समित्यांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस महापालिका अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे यांच्यासह समितीचे सदस्य, सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय अराणके, कृष्णा व्हॅली ऑफ चेंबर्सचे रमेश आरवाडे, मराठा उद्योजक फाउंडेशनचे चंद्रकांत पाटील, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे श्री. नेगांधी यांच्यासह औद्योगिक वसाहतींचे पदाधिकारी व उद्योजक आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, जिल्हा निर्यात प्रचालन समिती सभा आदि उद्योग विभागांशी संबंधित आढावा बैठक घेण्यात आली. तसेच, उद्योगांना एलपीजी गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, एमएसई सीडीपी योजनेंतर्गत राज्य शासनाचे 90 टक्के अनुदान मिळते. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्राच्या अनुषंगाने नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिबरेशन लॅबोरेटरीज म्हणजेच एनएबीएल टेस्टिंग लॅब सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, या योजनेत सहभागी होण्याच्या अनुषंगाने उद्योजकांनी सकारात्मकतेने विचार करावा. अधिकाधिक उद्योगांनी या प्रकल्पात सहभागी व्हावे. त्यामुळे या भागातील उद्योगांना टेस्टिंगसाठी अन्यत्र जावे लागणार नाही. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सोलापूर या सर्व जिल्ह्यातील उद्योजकांना त्याचा फायदा होईल. औद्योगिक वसाहतीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन इच्छुक उद्योजकांची यादी पंधरा दिवसात जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, ईएसआयसी रूग्णालय स्थापित करण्यासाठी आवश्यक जागेच्या अनुषंगाने प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला आहे. या अनुषंगाने निकषाप्रमाणे तातडीने कार्यवाही करत आवश्यक पाठपुरावा करावा. कुपवाड एमआयडीसी लगत असलेल्या स्मशानभूमीजवळ नियमित सफाई करावी. तसेच महानगरपालिकेने 15 दिवसात सीसीटीव्ही लावण्याची कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी उद्योगांना एलपीजीद्वारे गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने आढावा घेतला. उद्योगांना गॅस पुरवण्यात येणाऱ्या एलपीजी गॅससंदर्भात एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल या तिन्ही कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून गॅस पुरवठा करावा. तसेच, कोणतीही सबब न सांगता पीएनजी गॅस पुरवठ्याची कार्यवाही 15 दिवसात पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी सादरीकरण केले. यामध्ये औद्योगिक वसाहतींचे प्रश्न, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम क्लस्टरबाबतची कार्यवाही, याबाबत त्यांनी माहिती सादर केली. जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समिती सभेकडे कोणताही प्रस्ताव प्राप्त नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे 176 टक्के उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते व उद्योजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड प्रणाली- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्धांना  घरकुलासाठी मिळणार ₹२.५० लाख- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटीलØ सर्व नगरपरिषद क्षेत्रात रमाई आवास योजना सूरुØ गरजुंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

हनुमान जयंतीनिमित्त जागृत दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिराच्या बारागाड्या उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र कौंडण्यपूर शक्तिपीठ महामार्गाला जोडणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्दीनी नदीचे पूजन करून 211 मीटरची अखंड साडी अर्पण