vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांन मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या युवकांसाठी ही योजना असून या योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

ही योजना सुरु करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगाराची योग्य संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपचीसंधी मिळेल. या अंतर्गत युवकांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. या सोबतच त्यांना दरमहा ९००० रुपये विद्यावेतन मिळेल. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशा उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठीनोंदणी योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी करावी. या http://pminternship.mca.gov.in पोर्टलवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा येथे संपर्क करावा.

00000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यरत १०० कंत्राटी विषय शिक्षकांना कायम नेमणुकीचे आदेश,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आदेश वितरित…

vishwatmaklokswamivarta

शिर्डी: साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेत्या महिलेची चाकूने हत्या; दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यपालांच्या हस्ते १५ युवा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ सन्मानित-नव्या नवेली नंदा, मोना सिंग, जेनेलिया देशमुख सन्मानित

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

धारावी पीएमजीपी कॉलनी येथील शताब्दी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती उत्सव जल्लोषात

vishwatmaklokswamivarta

मुंबईत धारावी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सूर्यकांत परशुराम भालेकर भावी नगरसेवकाच्या यादीत असलेली चर्चा विभागात सुरू

vishwatmaklokswamivarta